बंद

    नगरपरिषद प्रशासन संचालनालय

    नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे राज्यस्तरीय कार्यालय असून, या संचालनालयाव्दारे 240 नगरपरिषदा व 125 नगरपंचायतींच्या कारभारावर नियंत्रण ठेवले जाते. संचालक, नगरपरिषद प्रशासन, नगरपरिषदांना / नगरपंचायतींना मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे नगरपरिषदांच्या वित्त व कार्यप्रणालीची सांख्यिकी माहिती गोळा करुन शासनास वेळोवेळी पुरविली जाते.

    महाराष्ट्र नगरपारिषद अधिनियम, 1965 च्या कलम 4 अन्वये प्रत्येक नगरपरिष्देच्या क्षेत्रांचे त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे खालीलप्रमाणे “”अ” , “ब”, व “क” वर्ग असे वर्गीकरण केलेले आहे :-

    1. 1,00,000 हून अधिक व 3,00,000 पर्यंत लोकसंख्या असलेले क्षेत्र हे “अ” वर्ग नगरपरिषद क्षेत्र असेल.
    2. 40,000 हून अधिक व 1,00,000 पर्यंत लोकसंख्या असलेले क्षेत्र हे “ब” वर्ग नगरपरिषद क्षेत्र असेल.
    3. 25,000 हून अधिक व 40,000 पर्यंत किंवा त्याहून कमी लोकसंख्या असलेले “क” वर्ग नगरपरिषद क्षेत्र असेल.
    4. 15,000 ते 25,000 पर्यंत लोकसंख्या असलेले क्षेत्र नगरपंचायत क्षेत्र असेल.

    नगरपालिका स्तरावर “मुख्य अधिकारी” हे कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत असतात. नागरी भागाचा विकास व नागरी भागात जनतेला पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रमुख कार्य आहेत.