उद्दिष्टे :
- महाराष्ट्र नगर रचना संचालनालयामार्फत महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांकडून बृहत योजना आणि विकास आराखाडा तयार करण्यासाठी तांत्रिक सहाय्य प्रदान करणे.
- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मेट्रो रेल्वे सेवांसाठी पायाभूत सुविधांची निर्मिती सुलभ करण्यासाठी वित्तपुरवठा करणे.
- दैनंदिन जीवन आणि आर्थिक क्रियाकलाप सुलभ करण्यासाठी वाहतूकीचे जाळे, रस्त्यांचे जाळे अशा भक्कम पायाभूत सुविधांचा विकास करणे.
- नागरी भागातील शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी पाणी, ऊर्जा आणि जमीन यासह शहरी संसाधनांचे कार्यक्षमतेने वापर व व्यवस्थापन करणे.
- महानगरांवरील भार कमी करण्यासाठी आणि अधिक संतुलित विकासाला चालना देण्यासाठी राज्यातील लहान शहरांमध्ये नागरिकरणाला चालना देणे.
- नागरी स्थानिक प्रशासन मजबूत करणे आणि नगर नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत जनसमुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे.
- शहरी विकासात गुंतवणूक आणि कौशल्य आकर्षित करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारीसाठी प्रोत्साहन देणे व गुंतवणुक आकर्षित करुन त्यातुन रोजगार निर्मिती करणे.
- नैसर्गिक आपत्ती आणि इतर अरिष्टांना सक्षमपणे सामना करु शकतील अशी शहरे विकसित करणे.
- प्रदूषण, कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदल यासारख्या समस्यांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी, उपाययोजना करुन शहरी जनजीवनाचे व पर्यावरणाचे संरक्षण करणे.
- नागरी भागातील सांस्कृतिक वारशाचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करणे.