नवि-03 (आस्थापना) |
- खुद्द नगर विकास विभागातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी – रजा, नियुक्ती, पदोन्नती, प्रतिनियुक्ती व शिस्तभंग विषयक कार्यवाही इत्यादी.
- नियतकालिक, मासिक, त्रैमासिक व प्रलंबित प्रकरणांचा मासिक अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करणे.
- नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे व प्रशिक्षण.
- भविष्यनिर्वाह निधीमधून परतावा व ना-परतावा अग्रीम मंजूर करणे.
- नगर विकास विभाग, मंत्रालय (खुद्द) व विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांसाठी घरबांधणी अग्रीम, वाहन अग्रीम, संगणक अग्रीम इत्यादीविषयक वित्तीय तरतूदींच्या बाबी.
- विभागातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अभिलेख संबंधीत बाबी.
- माहिती अधिकार अधिनियमानुसार जन माहिती अधिकारी, अपिलय प्राधिकारी घोषित करणे अथवा अधिनियमानुसार कार्यवाहीबाबतच्या सुचना देण्याच्या बाबी.
|
नवि-4 (अर्थसंकल्प व निधी वितरण शाखा) |
- अर्थसंकल्प व नियोजन विषयक बाबी.
- वित्त आयोग व विविध पॅकेजेस.
- मराठवाडा व कोकण विभागातील जिल्हा मुख्यालय नगरपरिषदा अनुदान.
- नागरी दलितवस्ती सुधारणा.
- नागरी आदिवासी सुधारणा.
- विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक.
- निधी वितरित केल्यानंतर निधी विनियोजन प्रमाणपत्र समन्वय.
- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने अर्थमत्र्यांचे भाषण.
- नागरी क्षेत्रातील महानगरपालिका / नगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणाबाबतच्या बाबी, अग्निशमन यंत्रणेची अनुदाने.
|
नवि-5 (रोख शाखा) |
- विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते अदा करणे, आहरण व संनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणे.
- अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत करणे.
- विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सहायक अनुदानाची देयके तयार करुन त्याचे प्रदान करणे.
- कार्यालयीन खर्चासह अन्य सर्व प्रकारची देयके तयार करुन त्यांचे वितरण करणे.
- नगर विकास विभाग, मंत्रालय (खुद्द) शी संबंधित लेख्यांचा खर्चमेळ करणे.
- नगर विकास विभाग, मंत्रालय (खुद्द) शी संबंधित वित्तीय तरतूदी करणे.
- कार्यालयीन कामकाजासाठी लागणा-या आकस्मिक निधीची व्यवस्था करणे.
- नगर विकास विभाग, मंत्रालय (खुद्द) संबंधित न्यायालयीन प्रकरणी वकीलांच्या फी साठी अनुदान उपलब्ध करण्यासाठी वित्तीय तरतूदींच्या बाबी.
|
नवि-6 (विधानमंडळ समन्वय शाखा) |
- विधानमंडळ कामकाज, सर्व समन्वयाच्या बाबी.
- मा. राज्यपाल यांचे अभिभाषण.
- मा. खासदार व लोकप्रतिनिधी यांच्या बैठकांचे कामकाज.
- मा. लोक आयुक्त / उप लोक आयुक्त यांचे अहवालामधील शिफारशी.
- मा. राज्यपाल यांचा त्रैमासिक अहवाल.
- मा. माहिती आयुक्त यांचा वार्षिक अहवाल.
- विशेष कार्य कक्ष व अतिमहत्वाच्या व्यक्तींचे संदर्भ समन्वय.
- मा. आमदार व मा. खासदार यांच्या तक्रारींचे समन्वय.
- केंद्र शासनामार्फत मा.मुख्य सचिव, मा.मुख्य मंत्री यांना प्राप्त झालेल्या पत्रव्यवहाराचा समन्वय.
- सेवाविषयक सर्व समन्वयाच्या बाबी (अपंग / मागासवर्गीय अनुशेष / सेवा भर्ती).
- सफाई कामगार यांचे बाबतीतील लाड-पागे समितीचा अहवाल त्या सबंधांतील बाबी.
- नगरपरिषदा / महानगरपालिका यांच्याशी संबंधित समन्वयाच्या बाबी (सामूहिक धोरणात्मक बाबी वगळून).
- मंत्रालय लोकशाही दिन समन्वय.
|
नवि-7 |
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा-1974 व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेशी संबधित सर्व बाबी (नगररचना संबधित बाबी वगळून).
- राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प.
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाशी संबंधित बाबी.
- मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन , मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन , महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन , महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ शी संबंधित बाबी.
- सार्वजनिक जलद वाहतुक प्रणाली , एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरण याच्याशी निगडीत बाबी.
|
नवि-8 (नोंदणी शाखा) |
- विभागात प्राप्त सर्व टपालाची आवक-जावक.
- विभागास आवश्यक जड वस्तू, साधन सामग्री, लेखन सामग्री, गट-ड व गट-क संवर्गातील कर्मचारी यांना गणवेश उपलब्ध करून देणे.
- वाहन खरेदी.
- विभागातील अधिकारी, मा. मंत्री यांच्या चहापानाच्या देयकांचे प्रदान करणे.
- अधिकारी / कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था.
- विभागातील दूरध्वनी, फॅक्स, झेरॉक्स व इतर सामग्री खरेदी, देखभाल व दुरुस्ती.
- विभागाच्या वाहनांची देखभाल व दुरुस्ती वंगणासाठी अनुदान उपलब्ध करून देणे.
- विभागातील सर्व गृहव्यवस्थापन विषयक बाबी.
|
नवि-9 |
- नागपूर व नाशिक विभागातील नगररचना विषयक बाबी.
- लहान व मध्यम शहारातील एकात्मिक विकास योजना.
|
नवि-10 |
- शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादीत संबंधित बाबी.
|
नवि-11 |
- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नगर रचना विषयक बाबी.
- विकास नियंत्रण नियमावलीमधील धोरणात्मक राज्यस्तरीय सुधारणा.
|
नवि-12 |
- मुंबई व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र वगळता कोकण विभागातील नगररचना विषयक कामकाज.
- नगररचनाविषयक संकीर्ण व सामाईक बाबी.
|
नवि-13 |
- पुणे महसूल विभागातील नगररचना विषयक बाबी.
- महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमात सुधारणा.
- वृक्ष प्राधिकरण अधिनियमात सुधारणा.
- पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाशी संबंधित नगर रचना विषयक बाबी.
- पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या सध्याच्या क्षेत्राची हद्ददवाढ करणे.
|
नवि-14 |
- मुख्याधिकारी संवर्ग आस्थापना.
- नगरपरिषद प्रशासन संचालनालय.
- नगरपरिषद संवर्गाच्या बाबी.
- नगर परिषद सहाय्यक अनुदान.
- महापौर, नगराध्यक्ष आरक्षण निश्चित करणे व त्यासंबंधित बाबी.
- राज्य अग्निशमन सल्लागार आणि संचालक यांच्या आस्थापना.
|
नवि-15 |
- नगरपरिषद अध्यक्ष / सदस्य यांना अनर्ह ठरविणे व पदावरुन दूर करणे. तसेच यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणे.
- मुख्याधिकारी व नगरपरिषेतील संवर्ग कर्मचारी यांच्या विभागीय चौकशीची प्रकरणे (विभागीय चौकशी, विभागीय चौकशीशी संबंधित न्यायालयीन प्रकरणे, अपील प्रकरणे, निलंबन आढावा समिती बैठक).
- लाचलुचपत विषयक प्रकरणी व फौजदारी गुन्ह्यांच्या प्रकरणात निलंबित करणे, निलंबन कालावधीबाबत निर्णय घेणे, अभियोग दाखल करण्यास मंजूरी देणे.
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारी वा अन्य प्रकरणात, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 च्या अधिनियमातील सुधारणा 2018 नुसार कलम 17 (अ) प्रमाणे तपास / चौकशीस परवानगी देणे.
- लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालय विषयक सर्व बाबींचे विभागातील समन्वय करणे.
|
नवि-16 |
- महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सुखसोयीच्या विकासासाठी विशेष तरतूद.
- महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सुखसोयीच्या विकासासाठी विशेष तरतूद (मनपा ठोक).
- नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान.
- नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान (नपा ठोक).
- नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य.
- हद्दवाढ झालेल्या महानगरपालिकांना नव्याने समाविष्ट क्षेत्रात नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य.
- नगरपालिका/नगरपरिषदानां त्यांच्या नव्याने विस्तारलेल्या सीमाक्षेत्रांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य.
- पहिल्या राज्य वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील गिरिस्थान नगरपरिषदांना विशेष पर्यटन विकास अनुदान.
- नव्याने स्थापन केलेल्या नगरपालिका / नगरपरिषदांना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य.
- महानगरपालिका क्षेत्रातील यात्रास्थळांसाठी विशेष कार्यक्रमांकरीता सहायक अनुदान.
- नगरपरिषद क्षेत्रातील यात्रास्थळांच्या विकास कार्यक्रमासाठी सहायक अनुदान.
- पैठण-आपेगाव शहर विकास प्राधिकरणास सहाय्य.
- तुळजापूर शहर विकास प्राधिकरणाला सहाय्य.
- राज्यातील महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायती यांना विशेष व सर्वसाधारण रस्ता अनुदान.
|
नवि-17 |
- नाशिक व औरंगाबाद महसूली क्षेत्रातील सर्व नगरपरिषदांच्या प्रशासकीय बाबी.
- या क्षेत्रातील नगरपरिषदांची हद्दबदल.
- या क्षेत्रातील नवीन नगरपरिषद व औद्योगिक नगरी स्थापना करण्यासंबंधीच्या बाबी.
- गृह निर्माण धोरण.
- कत्तलखाने व त्या संदर्भातील योजना.
- राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान.
- नागरी भागात सोलर स्ट्रिट लाईट योजना राबविणे.
- पर्यावरण विषयक बाबी.
- पर्यटन धोरण.
|
नवि-18 |
- पुणे, अमरावती व नागपूर विभागातील सर्व नगरपरिषदा / नगर पंचायतीच्या प्रशासकीय बाबी.
- या क्षेत्रातील नवीन नगरपरिषद / नगरपंचायत व नवीन औद्योगिक नगरी स्थापना करण्याच्या बाबी.
- पुणे, अमरावती व नागपूर या विभागातील नगरपरिषदा / नगर पंचायतीच्या हद्द बदल करण्याच्या बाबी.
- सोलापूर महानगरपालिकांच्या सर्व प्रशासकीय बाबी.
|
नवि-19 |
- कोल्हापूर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय बाबी.
- त्यांच्यात हद्दबदल आणि या क्षेत्रात औद्योगिक नगरी स्थापन करण्यासंबंधिच्या बाबी.
- कोकण विभागातील MMR मधील 13 नगरपरिषदा वगळून उर्वरित नगरपरिषदा.
- या क्षेत्रातील हद्दबदल करणे / औद्योगिक नगरी स्थापन करण्यासंबंधीच्या सर्व बाबी.
- मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नगर परिषदांच्या (अंबरनाथ/बदलापूर/अलिबाग/पनवेल/उरण/खोपोली/कर्जत/पेण व माथेरान) यांच्या प्रशासकीय बाबी.
|
नवि-20 |
- नगरपरिषदांचे / महानगरपालिकांचे सामाईक धोरण व त्यानुषंगाने उपस्थित होणाऱ्या समन्वयाच्या बाबी.
- महिला कल्याण धोरण.
- राज्य प्रशिक्षण धोरण.
- अभियंता दिन.
- महानगरपालिका व नगरपरिषदांच्या शिक्षकांच्या बाबी.
- कटक मंडळ क्षेत्राबाबतचे विषय.
- रस्त्यावरील खडडयांबाबतचे धोरण.
- कर्नाटक राज्याच्या धर्तीवर मध्ये विधानमंडळ सदस्यांना मतदानाचा अधिकार व अन्य सुविधा उपलब्ध करण्याबाबत.
- अनधिकृत देवस्थाने.
- कंत्राटी कामगार.
- राष्ट्रपती पदक अग्निशमन सेवा पदकासाठी शिफारसी.
- नागरी भागात पुतळा उभारणे / रस्त्याचे किंवा पुलाचे नामकरण करणे बाबतच्या धोरणात्मक बाबी.
- नागरी भागात पोलिस स्टेशन व न्यायालय स्थापन करण्याबाबतच्या धोरणात्मक बाबी.
- स्टेट डाटा बँक संबंधित बाबी.
- माजी सैनिक कर्मचाऱ्यांच्या बाबींचे समन्वय.
- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान.
- सामाजिक आर्थिक सर्वेक्षण.
- रात्रनिवारे.
- दारिद्रयरेषेखालील अनुसूचित जाती, जमाती व अल्पसंख्यांक लाभधारकांकरिता यशवंतराव चव्हाण कौशल्य विकास योजना राबविणे.
- विभागातील इतर कार्यासनाला विशिष्टपणे नेमून न दिलेले इतर विषय संकीर्ण बाबी.
|
नवि-21 |
- बृहन्मुंबई व उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय बाबी.
- वरील महानगरपालिका यांच्या संबंधित हद्द बदल करणे व औद्योगिक नगरी स्थापन करण्यासंबंधिच्या बाबी.
- बेस्ट विषयक प्रशासकीय बाबी.
- फेरीवाला धोरण.
टिप: (नवि-21) कार्यासनाच्या कक्ष अधिकारी व अवर सचिव यांचेकडील कामकाज वाटपाबाबत संबंधित उप सचिव/सह सचिव यांनी योग्य ती कार्यवाही त्यांचेस्तरावर करावी. असे करताना वाटप करण्यात आलेले विषय कक्ष अधिकारी/सस व प्रस तसेच अस/सस व प्रस असे त्रिस्तरीय सादरीकरण राहील याची दक्षता घ्यावी.
|
नवि-22 |
- पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या प्रशासकीय बाबी.
- त्यांच्यात हद्द बदल आणि या क्षेत्रात औद्योगिक नगरी स्थापन करण्यासंबंधीच्या बाबी.
- पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे यांच्या प्रशासकीय बाबी.
- जाहिरात धोरण.
|
नवि-23 |
- ठाणे, भिवंडी-निजामपूर व वसई-विरार व पनवेल महानगरपालिकांच्या प्रशासकीय बाबी.
- वरील महानगरपालिका यांच्या संबंधित हद्द बदल करणे औद्योगिक नगरी स्थापन करणे.
- मुंबई महानगर प्रदेशातील सर्व नगरपरिषदा.
|
नवि-24 |
- औरंगाबाद, नांदेड-वाघाळा, लातूर व परभणी महानगरपालिकांच्या प्रशासकीय बाबी.
- वरील महानगरपालिकांच्या संबंधित हद्द बदल करणे.
- सदर महानगरपालिका हद्दीत औद्योगिक नगरी स्थापन करणे.
|
नवि-25 |
- नाशिक, मालेगांव, धुळे, जळगांव व अहमदनगर महानगरपालिकांच्या प्रशासकीय बाबी.
- वरील महानगरपालिका यांच्या संबंधित हद्द बदल करणे.
- औद्योगिक नगरी स्थापन करणे.
- सिहंस्थ कुंभमेळा.
|
नवि-26 |
- नागपूर, अकोला, अमरावती व चंद्रपूर महानगरपालिकांच्या प्रशासकीय बाबी.
- वरील महानगरपालिका यांच्या संबंधित हद्द बदल करणे आणि औद्योगिक नगरी स्थापन करणे.
- नागपूर सुधार प्रन्यास.
|
नवि-27 |
- नगररचना संचालनालयाशी संबंधित प्रशासकीय बाबी.
- नगररचना संचालनालयातील गट अ व गट-ब अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या व बदल्या तसेच इतर सर्व प्रशासकीय बाबी.
- नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचे प्रशासनाशी संबंधित अर्थसंकल्पीय बाबी, विनियोजन लेखा व स्पष्टीकरणात्मक ज्ञापने.
- नवीन प्रादेशिक योजना व विकास योजना विशेष घटक कार्यालयांची स्थापना व पदनिर्मिती.
- नगररचना संचालनालयातील गट-अ व गट-ब अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी व त्यानुषंगाने उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे.
- नागरी जमीन कमाल धारणा कार्यालयांची क्षेत्रीय आस्थापना व अर्थसंकल्पीय बाबी, विनियोजन लेखा व स्पष्टीकरणात्मक ज्ञापने.
|
नवि-28 |
- कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर व नवी-मुंबई महानगरपालिकांच्या प्रशासकीय बाबी.
- वरील महानगरपालिका यांच्या संबंधित हद्दबदल करणे.
- जेष्ठ नागरीक धोरण.
- बालकल्याण धोरण.
- क्रिडा धोरण.
- अपंग सक्षमीकरण धोरण.
- ULB अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादा, परीक्षा उर्त्तीर्ण होण्यापासून सूट मिळणे.
- नविन महानगरपालिका / नगर परिषदा निर्माण करणे व औदयोगिक नगरी स्थापन करणे.
|
नवि-29 |
- विभागाचे सर्व शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचना, अधिनियम विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करणे व विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत ठेवणे.
- विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे ई-ऑफीस संबंधिताच्या सर्व बाबी.
- विभागाचा अभिलेख स्कॅनींग करणेबाबत समन्वय.
- विभागाकरिता संगणक आणि संगणकांशी संबंधित साहित्याची खरेदी.
- विभागाची नागरिकांची सनद विभागाच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करणे / सुधारित करणे.
|
नवि-30 |
- औरंगाबाद व अमरावती महसूल विभागातील नगररचना विषयक बाबी.
- 74 व्या घटना दुरुस्तीन्वये महानगर नियोजन समित्याची स्थापना.
- गुंठेवारी अधिनियम – धोरणात्मक बाबी.
|
नवि-31 |
- विभागाशी संबंधित विनियोजन लेखे.
- विभागातील सर्व लेखाशिषांतर्गत जमा व खर्चाचा ताळमेळ.
- विभागाचे लेखापरिक्षण बाबीचे समन्वय.
- महालेखापालाच्या अहवालांचे समन्वय.
- शासन हमी.
- शासनाकडून महानगरपालिका / नगरपरिषदांना वाटप केलेल्या कर्ज विषयक बाबीचे समन्वय.
- दुहेरी लेखापद्धती.
- नागरी वाणिज्यिक वैधानिक अहवालाचे समन्वय.
- अंदाज समिती / लोकलेखा समिती / सार्वजनिक उपक्रम समिती यांच्या समन्वयाच्या बाबी.
- विषय सूचीमध्ये नमूद नसलेल्या लेखा विषयक सर्व बाबींचे समन्वय.
|
नवि-32 |
- महानगरपालिका / नगरपरिषदा कायद्यात सुधारणा.
- महानगरपालिका / नगरपरिषदा अधिनियमातील दुरुस्ती बाबतच्या सामाईक बाबी.
- स्थानिक संस्थाकराची अंमलबजावणी.
- महाराष्ट्र नगरपरिषदा मालमत्ता कर मंडळ संबंधीच्या प्रशासकीय बाबी.
- प्रवेश उपकर व जकात. मोठ्या इमारतींवरील कराबद्दल प्रोत्साहन अनुदान.
- जमीन महसूल/बिनशेती कराच्या अभिहस्तांकित रक्कमा (नगरपालिका/महानगरपालिका) कटक मंडळे, यात्रा कर, मोठ्या क्षेत्रफळाच्या निवासी महानगरपालिकांना नुकसान भरपाईची रक्कम देणे.
- स्थानिक संस्था कर अनुदाने.
- केंद्र पुरस्कृत स्मार्ट सिटी योजना.
- मुन्फ्रा व त्या विषयींच्या संबंधित बाबी.
- सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून नागरी पायाभूत सुविधांचा विकास व सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून प्रकल्प उभारण्याचे धोरण याबाबतचे प्रस्तावित धोरण.
- ई-गव्हर्नस.
- नागरी स्वराज्य संस्थांचे संगणीकरण.
|
नवि-33 |
- अमृत अभियान.
- जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुथ्थान योजना व नगरोथ्थान कार्यक्रम.
- लहान मध्यम शहरांच्या पायाभूत सोयी-सूविधांचा विकास कार्यक्रम.
- ई-गव्हर्नन्स.
- एन.यू.आय.एस.
- उपयुक्तता मॅपिंग.
- जी.आय.एस. मॅपिंग.
- नागरी स्वराज्य संस्थांचे संगणकीकरण.
- सार्वजनिक व खाजगी भागीदारीतून प्रकल्प उभारण्याचे धोरण.
- पाणी पुरवठा विभागाच्या बाबी.
- शहर बेंचमार्किंग.
|
नवि-34 |
- नागरी स्वच्छता अभियान.
- संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाशी संबंधित बाबी.
- उद्योग धोरण.
- प्लास्टिक पिशव्यांबाबत धोरण.
- हाताने सफाई करणारे.
- श्रमसाफल्य योजना.
- नागरी घन कचरा नियम.
|
नवि-35 |
- महाराष्ट्र महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कायदा-२०१६.
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.
- नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.
- छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.
- नागपुर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण.
- एमआरटीपी कायदा-१९६६ कायद्यांतर्गत प्रस्तावित अन्य प्राधिकरणे.
- कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण, कोल्हापूर.
- सिंधुदुर्ग नगरी नवनगर विकास प्राधिकरण, सिंधुदुर्ग.
|
नाजकधा |
- बृहन्मुंबई, कोल्हापूर, पुणे, नाशिक, सांगली, ठाणे, उल्हासनगर, सोलापूर व नागपूर नागरी जमीन कमाल धारणा अंतर्गत जमिनीविषयक बाबी.
- सदर नागरी समूहांतर्गत 5 टक्के सदनिका मुख्यमंत्री कोट्यातून वाटप.
- ना. ज. क. धा. अधिनियमाबाबत धोरणात्मक बाबी.
- अतिरिक्त जमिनीची नुकसान भरपाई देणेबाबत निधीची तरतूद.
|