मेट्रो मार्ग 4 व 4अ… वेळ आणि ऊर्जा वाचवणारा विकासमार्ग!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमएमआरडीएच्या ‘मेट्रो मार्ग-4 व 4 अ, टप्पा-1, गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी पार पडली, यावेळी त्यांनी चाचणीचा शुभारंभ केला.
मेट्रो मार्ग 4 व 4अ ची वैशिष्ट्ये :
- मेट्रो मार्ग 4 (32.32 किमी) व 4अ (2.88 किमी) मिळून एकूण 35.20 किमी लांबीचा प्रकल्प
- 8 डब्यांची मेट्रो, एकूण 32 स्थानके, सुमारे ₹16,000 कोटी खर्च
- दररोज जवळपास 13.43 लाख प्रवासी प्रवास करतील
- मोगरपाडा येथे 45 हेक्टर जागेवर डेपो, ज्यातून मेट्रो 4, 4अ, 10 व 11 चे व्यवस्थापन होणार
- पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर, मुंबई व ठाणे शहर जोडणारी मेट्रो
- वडाळा ते सीएसएमटी जोडणाऱ्या मेट्रो 11 शी जोडणी झाल्यावर देशातील सर्वात लांब 58 किमी मेट्रो कॉरिडॉर तयार होणार
- प्रवासाचा वेळ 50–75% कमी, रस्त्यावरच्या वाहतुकीवरील ताण कमी