नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा
कुंभमेळा हा एक महत्वाचा धार्मिक मेळावा असून तो, महाराष्ट्र राज्यातील नाशिक विभागाच्या नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये आणि इतर क्षेत्रांमध्ये सुमारे दर बारा वर्षांमधून एकदा आयोजित केला जातो. साधू व महंत यांच्यासह विविध धार्मिक व सामाजिक संघटना तसेच राज्य शासनाचे सर्व विभाग यांच्या परस्पर सहकार्याने कुंभमेळा आयोजित केला जातो.
सदर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळयाच्या अनुषंगाने नगर विकास विभाग नवि-2 यांच्या कडून पुढील तरतूदी करण्यात आलेल्या आहेत.
- नाशिक – त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम,2025 दि.10.07.2025 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.
- नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम,2025 नुसार दि.15.09.2025 रोजीच्या अधिसूचनेव्दारे २२ सदस्यांचा समावेश असलेले प्राधिकरण गठीत करण्यात आलेले आहे.
- नाशिक व त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक येथे सन 2027-2028 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळयाच्या नियोजनासाठी दि.19.09.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मा.मुख्यमंत्री महोदय यांच्य अध्यक्षतेखाली शिखर समिती आणि मा.मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.
- नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियम, 2025 मधील कलम 3 अन्वये दि.19.09.2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये कुंभमेळा मंत्री समिती गठीत करण्यात आलेली आहे.