बंद

    अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू

    अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू

    पार्श्वभूमी

    • मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू प्रकल्पाचा प्रस्ताव सुमारे ३० वर्षांपूर्वीपासून विचाराधीन होता.

    • शासनाने दि.०४ फेब्रुवारी, २००९ च्या शासन निर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असेल असे आदेशित केले. महाराष्ट्र शासनाने दि. ०८ जून, २०११ च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे या प्रकल्पास प्रादेशिक विकास प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.

    • सदर प्रकल्पामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे.

    विशिष्ट मुद्दे

    • सेतू आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असून, सदर प्रकल्पामुळे अपघातांची शक्यता कमी झाली आहे. तसेच, प्रवाशांना जलद आणि सुरक्षित मार्ग मिळाल्यामुळे त्यांच्या प्रवासाचा अनुभव सुखकर झाला आहे.

    • सेतूच्या मदतीने शहरात आणि आसपासच्या भागात पर्यटनाचा विकास झाला आहे. व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रांना फायदा झाला असून, स्थानिक अर्थव्यवस्था अधिक बळकट होत आहे.

    • अटल सेतूने वाहतुकीचे भार कमी करून मुंबई शहरातील स्थानिक रस्त्यांवरील दबाव कमी केला आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या रोजच्या जीवनात सुखसोयी मिळत आहेत.

    • प्रकल्पामुळे बांधकामाच्या काळात आणि उद्घाटनानंतर देखील अनेक स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारली आहे.

    • ऑर्थोट्रोपिक स्टील डेक तंत्रज्ञान हे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या उड्डाण मार्गाचे संरक्षण करण्यात मदत करते, त्यांच्या नैसर्गिक पद्धतींमध्ये कमीतकमी व्यत्यय आणते.

    • वाहतुकीमुळे फ्लेमिंगोना होणारा त्रास कमी करण्यासाठी नॉईस बॅरिअर बसविण्यात आले आहेत, ज्यामुळे या पक्ष्यांच्या संरक्षाणाच्या दृष्टिने प्राधान्य दिले जाते.

    प्रकल्पाची माहिती

    • प्रकल्पाच्या वावामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे २१.८ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे.

    • या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे.

    • प्रकल्पाची एकूण किंमत : ११७,८४३ कोटी

    • काम सुरु झाल्याचा दिनांक:मार्च, २०१८

    • काम पूर्णत्वाचा दिनांक: ०५/०१/२०२४.

    प्रकल्पाची सद्यःस्थिती

    • सदर प्रकल्पाचे उद्घाटन मा. प्रतंप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१२/०१/२०२४ रोजी करण्यात आले असून, प्रकल्प रहदारीसाठी दि.१३/०१/२०२४ रोजी पासून खुला करण्यात आला आहे.