बंद

    मुंबई मेट्रो मार्गिका क्र. 8 (छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प)

    नगर विकास
    • मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सध्यास्थितीत केवळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यरत आहे. जे दाट नागरी वस्तीने वेढलेले आहे आणि विस्तारासाठी फारच मर्यादित जागा उपलब्ध आहे. या‍ विमानतळामध्ये कार्यरत आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी भविष्यातील मुंबई महानगर प्रदेशची हवाई वाहतूकीची गरज लक्षात घेता लवकरच या विमानतळाची क्षमता कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्याकरीता मुंबई महानगर प्रदेशामध्ये नवी मुंबई येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे आणि या टप्प्यात हे विमानतळ दरवर्षी 20 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्यास सक्षम असेल आणि 2038 मध्ये संपुर्ण कार्यान्वित झाल्यानंतर 90 दशलक्ष प्रवाशांना दरवर्षी सेवा प्रदान करु शकेल. नवी मुंबई विमानतळाची मालवाहतुक क्षमता पहिल्या टप्प्यात 0.8 दशलक्ष मेट्रिक टन असून अंतिम टप्प्यात ती 3.2 दशलक्ष मेट्रिक टन इतकी होईल. प्रवासी व मालवाहतूक क्षमतेच्या दृष्टीने हे नवीन विमानतळ मुंबई महानगर प्रदेश साठी आर्थिक विकासाचे केंदबिंदू ठरण्याची अपेक्षा आहे. म्हणूनच मुंबई महानगर प्रदेश च्या विविध भागातून आणि त्यापलिकडे वाहतूक करणा-या प्रवाशांना, कर्मचाऱ्यांना आणि इतर लाभार्थ्यांना नवी मुंबई विमानतळ पर्यंत पोहचने योग्य करण्यासाठी आवश्यक उच्च क्षमतेच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई महानगर क्षेत्रासाठी 2021 मध्ये तयार करण्यात आलेल्या समग्र वाहतूक अभ्यासात (Comprehensive Transport Study – CTS), छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामध्ये जलद, थेट आणि आरामदायी प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक प्रणालीची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने, तसेच उपनगरीय रेल्वे वरील ताण कमी करण्यासाठी आणि मुंबई व नवी मुंबई यांच्यामधील जोडणी सुधारण्यासाठी सार्वजनिक वाहतूक प्रणाली आवश्यक आहे.

    • त्यानुसार सिडकोने मेट्रो रेल प्रणाली अंतर्गत (मेट्रो मार्गिका 8) चा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सल्लागार मे. अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लि. (UMTC) या सल्लागारा मार्फत तयार केला आहे. सविस्तर पर्यायी विश्लेषण अहवालाच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान सर्वात योग्य मेट्रो मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ च्या टर्मिनल 2 पासून सुरू होतो आणि फिनिक्स मॉल (एल बी एस मार्ग), एस . जी. बर्वे मार्ग, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), बैंगनवाडी, मानखुर्द, वाशी, जुईनगर, नेरूळ, सिवुड्स, सागर संगम आणि तरघर या परिसरांमधून जातो व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ च्या T2 येथे समाप्त होतो. एकूण 34.89 किलोमीटर लांबीच्या या मार्गामध्ये 9.25 किलोमीटरचा भुयारी मार्ग असून उर्वरित 25.64 किलोमीटर मार्ग उन्नत प्रस्तावित आहे.

    • महाराष्ट्र शासनाने (GoM) दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी निर्गमित शासन निर्णय क्रमांक MRD-3324/प्र.क्र.26/नवि-7, नुसार भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, प्रचलित सार्वजनिक-खाजगी भागिदारी (PPP) योजने अंतर्गत “मेट्रो मार्गिका 8 (छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)” प्रकल्पाच्या अंमलबजावणीला तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.

    • सविस्तर प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाचा प्रत्यक्ष बांधकाम कालावधी 60 महिन्यांचा असून जून 2026 मध्ये काम सुरू होवून ते मे 2031 मध्ये पूर्ण होण्याचे अपेक्षिले आहे. त्यानंतर, जून 2031 पासून सेवा सुरू होणे अपेक्षित आहे.

    • संचालन सुरू होण्याची तारीख: 17 नोव्हेंबर 2023
    • सरासरी दैनिक प्रवासी : 26,000 पर्यंत.
    • सरासरी दैनिक महसूल : 5.25 लाख रुपये.
    • आजपर्यंत एकूण प्रवासी : 104.00 लाखांपेक्षा जास्त.