सिडको नवीन मुंबई विमानतळ प्रकल्प

नवी मुंबई येथे विकसित होत असलेले विमानतळ हे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. विदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी विमानसेवाविषयक सुविधा वाढविने ही काळाची गरज आहे. तसेच हवाई वाहतुकीचा वाढता कल लक्षात घेता ही वाहतूक २०३४ पर्यंत १०० दशलक्ष प्रवासी प्रति वर्ष पर्यंत वाढण्या वाढण्याची शक्यता आहे. ही बाब विचारात घेता आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे मुंबईचे स्थान भविष्यात अबाधित राखण्यासाठी एमएमआर क्षेत्रात दुसरे विमानतळ तयार करणे गरजेचे आहे.