डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजना
-
डॉ. बाबासाहेब आबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत राज्यातील नगरपालिकेतील / महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे विशिष्ट स्वरूपाचे काम विचारात घेऊन ज्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्ष किंवा त्याहून अधिक झाली आहे अशा सफाई कामगारांना सेवानिवृत्तीनंतर किवा सफाई कामगाराचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अशा सफाई कामगारांच्या निधनानंतर त्याच्या पात्र वारसास मालकी तत्वावर २६९ चौ. फुट बटई क्षेत्राच्या सदनिका मोफत उपलब्ध करून देण्यासाठी नागरी स्थनिक स्वराज्य संस्थेस अनुदान वितरीत करण्याबाबतचा निर्णय दि. २२ ऑक्टोबर, २००८ च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे.
-
डॉ बाबासाहेब आबेडकर श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी व संनियत्रणाची जबाबदारी व योजनेची कार्यपध्दती दिनाक २८.३.२०१३ च्या शासन निणर्यान्वये विहित केली आहे.
-
सफाई कर्मचारी व त्याच्या संघटना त्यांना सद्याच्या सेवानिवासस्थानांच्या जागेवरच मोफत सदनिका उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे केलेल्या मागणीचा विचार करून महानगरपालिका / नगरपालिका / नगरपंचायती यांच्या मालकीच्या जमिनीवर असलेल्या सद्याच्या सेवानिवासस्थानाच्या ठिकणी, सफाई कर्मचाऱ्यांची सेवानिवासस्थाने तसेच डॉ. बाबासाहेब आवेडकर श्रमसाफल्य योजनेच्या निकषानुसार मोफत सदनिका उपलब्ध करुन देण्यासाठी ४.०० या कमाल चटई क्षेत्र निर्देशांकाच्या मर्यादेत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांपैकी ५०% सदनिका सेवानिवासस्थाने म्हणून व उर्वरित ५० % सदनिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सेवानिवृत्त सफाई कार्मचाऱ्याऱ्यांना अथवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या पात्र वारसाना मालकी हक्काने मोफत उपलब्ध करुन देण्यास दिनाक १२ जून २०१५ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
-
शासन निर्णय, नगर विकास विभाग दिनांक २२.१०.२००८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवारा योजना लागू करण्यात आली असल्याने या आदेशाच्या दिनांकानंतर ज्या सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे असे सफाई कामगार व दिनांक २२.१०.२००८ नंतर सेवेत असलेले जे सफाई कामगार मृत्यू झाले आहेत अशा मृत सफाई कामगारांचे पात्र वारस या योजनेअंतर्गत पात्र असतील.
-
दिनांक २२.१०.२००८ नतर सेवेत असताना ज्या सफाई कामगारांना वैद्यकीय अधिकाऱ्यानी पुढील सेवेसाठी वैद्यकीय कारणास्तव असमर्थ ठरवून रूग्णता सेवानिवृत्त केले आहे, अशा सफाई कामगाराचा पात्र वारस सेवेत असेल व त्या पात्र वारसाच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस त्यांची पात्र सेवा २५ वर्षे होत नसेल तर रूग्णता सेवानिवृत्त केलेल्या सफाई कार्मचाऱ्यांनी केलेल्या पात्र सेवेचा कालावधी डॉ. बाबासाहेव आवेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत लाभ देण्यासाठी २५ वर्षाची पात्रता ठरविण्याकरिता विचारात घेण्यात येतो.
लाभार्थी:
ज्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्षे किंवा त्याहून अधिक झाली आहे. सेवानिवृत्त सफाई कामगार किंवा त्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेल्या सफाई कामगारांचे पात्र वारस.
फायदे:
२५ वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या सफाई कामगारांना मोफत सदनिका मिळणार. सेवानिवृत्त झालेल्या किंवा मृत सफाई कामगारांच्या वारसांना २६९ चौ. फुट क्षेत्राचे सदनिका मोफत मिळविण्यासाठी अनुदान दिले जाते.
अर्ज कसा करावा
वरील माहिती पहा