बंद

    नगरोत्थान महाभियान

    • तारीख : 22/02/2024 -

    नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याच्या अनुषंगाने नगरोत्थान महाभियान राज्यामध्ये सन २०१० पासनू राबविण्यात येत आहे.

    सदर अभियानाची अंमलबजावणी आता २२ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत सर्व महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद / नगरपंचायतमध्ये पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जल निचरा वाहिनी, रेल्वे ओव्हर ब्रीज, राष्ट्रीय महामार्गासाठी आवश्यक भूसंपादन, प्रमुख विमानतळ व प्रमुख रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे भूसंपादन प्रकल्प यांचा समावेश आहे. तसेच, ड वर्ग महानगरपालिका, सर्व नगरपरिषद / नगरपंचायतमध्ये वरील नमूद प्रकल्पासोबतच वरील नमूद प्रकल्पासोबतच नागरी दळणवळण, सौर ऊर्जा उपांग, सामाजिक सोयी व सुविधांचा विकास यांचा समावेश आहे.

    लाभार्थी:

    सर्व महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायती या योजनेतून लाभ घेणार आहेत

    फायदे:

    पाणीपुरवठा, मलनिस्सारण, पर्जन्य जल निचरा वाहिनी, रेल्वे ओव्हर ब्रीज, राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन आणि मुख्य विमानतळ व रेल्वे स्थानकांना जाणारे रस्ते यासाठी प्रकल्पांची अंमलबजावणी. सौर ऊर्जा उपांग, नागरी दळणवळण, समाजिक सोयी व सुविधांचा विकास यांचा समावेश आहे

    अर्ज कसा करावा

    वरील माहिती पहा