Skip to main content

नगरपरिषद प्रशासन संचालनालय

नगरपरिषद प्रशासन संचालनालय हे राज्यस्तरीय कार्यालय असून, या संचालनालयाव्दारे 240 नगरपरिषदा व 125 नगरपंचायतींच्या कारभारावर नियंत्रण ठेवले जाते. संचालक, नगरपरिषद प्रशासन, नगरपरिषदांना / नगरपंचायतींना मार्गदर्शन करतात. त्याप्रमाणे नगरपरिषदांच्या वित्त व कार्यप्रणालीची सांख्यिकी माहिती गोळा करुन शासनास वेळोवेळी पुरविली जाते.

महाराष्ट्र नगरपारिषद अधिनियम, 1965 च्या कलम 4 अन्वये प्रत्येक नगरपरिष्देच्या क्षेत्रांचे त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे खालीलप्रमाणे “”अ” , “ब”, व “क”  वर्ग असे वर्गीकरण केलेले आहे :- 
( अ ) 1,00,000 हून अधिक व 3,00,000 पर्यंत लोकसंख्या असलेले क्षेत्र हे “अ” वर्ग नगरपरिषद क्षेत्र असेल.
( ब ) 40,000 हून अधिक व 1,00,000 पर्यंत लोकसंख्या  असलेले  क्षेत्र हे “ब” वर्ग नगरपरिषद क्षेत्र असेल.
( क ) 25,000 हून अधिक व 40,000 पर्यंत किंवा त्याहून कमी लोकसंख्या असलेले “क” वर्ग नगरपरिषद क्षेत्र असेल.
( ड ) 15,000 ते 25,000 पर्यंत लोकसंख्या असलेले क्षेत्र नगरपंचायत क्षेत्र असेल. 

नगरपालिका स्तरावर “मुख्य अधिकारी”  हे कार्यालय प्रमुख म्हणून कार्यरत असतात. नागरी भागाचा विकास व नागरी भागात जनतेला पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करुन देणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची प्रमुख कार्य आहेत.